Crime

पुण्यात पुन्हा हिट अँड रन; पिंपळे गुरव मधील घटना, थरकाप उडवणारा अपघाताचा व्हिडिओ समोर

190 0

राज्यभरात हिट अँड रनच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना दिसत आहे. पुण्यात देखील बुधवारी पुन्हा एकदा हिट अँड रन ची घटना घडली. बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पिंपरी चिंचवड मधील पिंपळे गुरव भागातील बस स्टॉप च्या समोर हा अपघात झाला असून भरधाव चारचाकीने दुचाकीस्वारास धडक देत लांब वर फरफटत नेले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

ज्या कार मुळे हा अपघात झाला त्या कारचा चालक हा मद्यधुंद असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शीनी केला आहे. अपघातानंतर आरोपी चालक पळून गेला आहे. तर सुदैवाने या अपघातात दुचाकीस्वारचा जीव वाचला असला तरीही तो सध्या गंभीर जखमी आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तात्काळ आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!