Crime

पुण्यात पुन्हा हिट अँड रन; पिंपळे गुरव मधील घटना, थरकाप उडवणारा अपघाताचा व्हिडिओ समोर

61 0

राज्यभरात हिट अँड रनच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना दिसत आहे. पुण्यात देखील बुधवारी पुन्हा एकदा हिट अँड रन ची घटना घडली. बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पिंपरी चिंचवड मधील पिंपळे गुरव भागातील बस स्टॉप च्या समोर हा अपघात झाला असून भरधाव चारचाकीने दुचाकीस्वारास धडक देत लांब वर फरफटत नेले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

ज्या कार मुळे हा अपघात झाला त्या कारचा चालक हा मद्यधुंद असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शीनी केला आहे. अपघातानंतर आरोपी चालक पळून गेला आहे. तर सुदैवाने या अपघातात दुचाकीस्वारचा जीव वाचला असला तरीही तो सध्या गंभीर जखमी आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तात्काळ आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

Share This News

Related Post

महत्वाची बातमी ! चारा घोटाळ्यातील दोरांडा प्रकरणात लालूप्रसाद यादव दोषी

Posted by - February 15, 2022 0
नवी दिल्ली- तब्बल 23 वर्षांपूर्वीच्या बहुचर्चित चार घोटाळ्यातील दोरांडा प्रकरणात राजदचे राष्ट्रीय अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आले आहे.…

कॉलेज बंक मारून फिरायला गेले अन् गमावला जीव; मावळमधील विद्यार्थ्यांबरोबर नेमकं काय घडलं ?

Posted by - July 20, 2024 0
पुणे जिल्ह्यातील मावळ मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कॉलेजला दांडी मारून फिरायला गेलेल्या पाच विद्यार्थ्यांबरोबर एक दुर्घटना घडली. ज्यात…

पुणे : जिल्ह्यात ५० हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त

Posted by - November 10, 2022 0
पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने पुणे जिल्ह्यात सुमारे ५० हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्याची कारवाई…

अरे बापरे ! मोक्कातील आरोपीला लॉकअप बाहेर काढून आरोपी पलायन करण्यास मदत केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे निलंबन

Posted by - February 3, 2023 0
पुणे : सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन केले आहे. मिळालेल्या धक्कादायक…

धक्कादायक : कोयता गॅंग मधील 7 अल्पवयीन मुलांची बाल निरीक्षण गृहात केली होती रवानगी; भिंतीला शिडी लावून असे झाले फरार

Posted by - January 31, 2023 0
पुणे : शहरातील कोयता गॅंग मधील सात अल्पवयीन मुलांची रवानगी येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राच्या बालनिरीक्षणगृहामध्ये करण्यात आली होती.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *