दारूसाठी पैसे न दिल्यामुळे अल्पवयीन मुलांनी गुंडाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास रामटेकडी परिसरातील वंदेमातरम् चौकात घडली. राजू शिवशरण असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी निखिल कैलास चव्हाण यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू शिवशरण, महेश शिंदे, नितीन पाटोळे, अरविंद माने, चेतन बावरी, दुर्गेश बल्ल्या गायकवाड हे सगळे मित्र आहेत आहेत. ते शुक्रवारी मध्यरात्री वंदेमातरम चौकात दारू पिऊन थांबले होते. त्यावेळी आणखी दारु आणण्यासाठी इतरांनी राजूकडे पैसे मागितले. मात्र त्याने पैसे देण्याला नकार दिला. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाले. मयत राजू याने इतरांना शिवीगाळ केली. त्याच रागातून इतर मुलांनी मिळून राजूला मारहाण केली. त्यांनी राजूला वीट, दगड, सिमेंटच्या तुकड्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्याचवेळी एका मुलाने राजूच्या डोक्यात दगड घातला तर दुसऱ्याने चक्क दारूची बाटलीच घातली. ज्यामुळे राजूला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. त्यावेळी फिर्यादीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र महेश शिंदे याने फिर्यादीच्या डोक्यात देखील बाटली मारली. त्यानंतर ही सर्व मुलं तिथून पळून गेली. राजूला तात्काळ ससून रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला असून संशयीत पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हडपसर येथे खाजगी बसला आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण https://www.topnewsmarathi.com/breaking-news/private-bus-fire-at-hadapsar-control-of-fire-by-fire-brigade/
पुण्यात पुन्हा कोयता गॅंग ऍक्टिव्ह ? ‘…तर तुला जिवंत सोडणार नाही’; धमकी देत तरुणावर हल्ला https://www.topnewsmarathi.com/crime/koyta-gang-active-again-in-pune-then-will-not-leave-you-alive-threatened-and-assaulted-the-youth/