मुंबई : येत्या 24 तासात मान्सून (Monsoon News) केरळमध्ये दाखल होण्याचा प्राथमिक आणि महत्त्वाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यामुळे लोकांना उकाड्यापासून काही काळ दिलासा मिळणार आहे. सध्या मान्सूनच्या प्रवासाच्या अनुषंगानं आणि हे मोसमी वारे केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचीही माहिती हवामान विभागानं दिली. प्राथमिक अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये 31 मे रोजी धडकण्याची शक्यता होती. पण, तो अशाच वेगानं पुढे येत राहिला तर काही तास आधीच केरळची वेस ओलांडू शकतो.
महाराष्ट्रात कधी दाखल होणार मान्सून?
केरळात 30 ते 31 मे पर्यंत मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवल्यानंतर आता तो महाराष्ट्रात केव्हा येणार असाही प्रश्न अनेकांनीच विचारला. महाराष्ट्राआधी मान्सून कर्नाटकात प्रवेश करणार असून त्यासाठी 6 किंवा 7 जूनची तारीख वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार राज्यात 10 ते 11 जूनदरम्यान पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून, मुंबईपासून मान्सूनची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 13 ते 14 जूनपर्यंत मान्सून बंगळुरूपर्यंत मजल मारेल असं सांगण्यात येत आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Crime News : फोटो मॉर्फींग करून अल्पवयीन मुलाची बदनामी; आरोपीवर गुन्हा दाखल
Pune Fire : पुण्यातील कमला नेहरू पार्क जवळील इमारतीत भीषण आग; अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल
Dr Ajay Taware : ब्लड फेरफार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेले डॉ. अजय तावरे नेमके कोण आहेत?
Pune Porsche Car Accident : डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांचे निलंबन
HDFC Bank Alert :एचडीएफसी बँकेने UPI व्यवहारांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Sangli Accident : ‘तो’ वाढदिवस ठरला अखरेचा ! बर्थडे गर्लसह संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत
Crime News : धक्कादायक ! ‘या’ भाजप उमेदवाराच्या ताफ्याने 3 जणांना उडवलं