Accident News

Accident News : मिनी बस आणि स्कॉर्पिओमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

1395 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मिनी बस आणि स्कोर्पिओची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात (Accident News) झाला. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच 20 जण जखमी झाले आहेत. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील सिंघाना पोलीस स्टेशन परिसरात हा अपघात झाला.

काय घडले नेमके?
मिनी बस आणि स्कॉर्पिओची जोरदार धडक झाली. अपघातानंतर रस्त्यावर मृतदेह पाहून रस्त्यावरून जाणाऱ्यांना धक्काच बसला. जखमी आणि मृतांना सिंघाना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सिंघाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थाळीजवळ हा अपघात झाला. त्यावेळी सिंघाना ते बुहाना दरम्यान धावणारी खाजगी मिनी बस बुहाना येथे जात होती.

बस थळीजवळ आली असता तिने समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर घटनास्थळी मोठी खळबळ उडाली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Jharkhand ED Raids : काँग्रेस नेत्याच्या अडचणीमध्ये वाढ ! नोकराच्या घरी आढळले ‘एवढ्या’ कोटींचे घबाड

Kangana Ranaut : ‘…तर मी बॉलिवूड सोडणार’, कंगना रणौतचे मोठे वक्तव्य

Kalyan Loksabha : कल्याण लोकसभेमध्ये मोठा ट्विस्ट; ठाकरे गटाच्या रमेश जाधवांनी घेतली माघार

Sangli Loksabha : बंडखोर विशाल पाटलांवर अजून कारवाई का केली नाही? काँग्रेसने केला ‘हा’ खुलासा

Maharashtra Weather Today : ऊन-पावसाचा खेळ सुरूच! एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पावसासोबत गारपिटीचा इशारा

Nashik News : सप्तश्रृंगी गडावरून उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या

Punit Balan : ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून ‘एसएनडीटी‘ला 60 संगणक भेट

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत महाष्ट्रात ‘या’ 11 ठिकाणी होणार हायहोल्टेज सामने

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!