Junnar News

Junnar News : बैलगाडा शर्यतीदरम्यान गेला तोल; मात्र पठ्ठयाने प्रसंगावधान राखत पूर्ण केली शर्यत

332 0

जुन्नर : बैलगाडा शर्यतीचा थरार पुण्यातील जुन्नर (Junnar News) येथे पाहायला मिळाला. या शर्यतीदरम्यान एक थरारक घटना समोर आली. यामध्ये दैव बलवत्तर म्हणून बैलगाड्यावर असलेला व्यक्ती थोडक्यात बचावला आहे. सध्या या शर्यतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे मळगंगा मातेच्या यात्रा उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती दरम्यान काळजाचा ठोका चुकवणारा एक प्रसंग बैलगाडा घाटात पाहायला मिळाला. नितीन मेरगळ या बैलगाडा मालकाची बारी जुंपतेवेळी जुपणेकरी हा बारी सुटल्याने जुकाटाच्या मध्ये अडकला.

यानंतर या व्यक्तीने चपळाई दाखवत थेट जुकाटाला घट्ट पकडून लटकट तसाच बैलगाडा घाट पार केला. त्याने घाट पार करताच सगळ्यांच्या जीवात जीव आला. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Onion Export : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कांद्यावरील निर्यातबंदी हटवली

Gangadhar Gade : ज्येष्ठ नेते माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं निधन

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Pune News : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे ‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिना’निमित्त महापालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide