pune crime

Pune News : खबळजनक ! आईच्या कुशीत विसावलेल्या 7 महिन्यांच्या बाळाची अज्ञाताकडून चोरी

510 0

पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आईच्या कुशीत विसावलेल्या 7 महिन्यांच्या बाळाची एका अज्ञात व्यक्तीने चोरी केली आहे. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अजय तेलंग यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

काय घडले नेमके?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंग दाम्पत्य मूळचे भुसावळचे असून ते पुण्यात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. शनिवारी मध्यरात्री तेलंग दाम्पत्य पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात झोपले होते. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने तेलंग यांचा ७ महिन्यांचा मुलगा श्रावण याला उचलून नेले. तेलंग दाम्पत्याला जाग आली. तेव्हा श्रावण जागेवर नसल्याचे आढळून आले. त्यांनी आजूबाजूला शोधाशोध घेतली असता, तो कुठेही दिसून आला नाही. यानंतर घाबरलेल्या तेलंग दाम्पत्याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. यामध्ये ७ महिन्यांच्या श्रावणचे अपहरण करणारी व्यक्ती दिसून आली. बंडगार्डन पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Madha Loksabha : शरद पवारांना माढ्यात मोठा धक्का ! ‘हा’ नेता लागला फडणवीसांच्या गळाला

Weather Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट

Supriya Sule : अजित पवारांनी केलेल्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंनी दिले चोख उत्तर

Sahil Khan : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बॉलीवूड अभिनेता साहिल खानला अटक

Sharad Pawar : डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!