Solapur News

Solapur News : हृदयद्रावक ! 8 वर्षीय चिमुकलीला अवकाळी पावसामुळे गमवावा लागला जीव

458 0

सोलापूर : सोलापूरमधून (Solapur News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये अवकाळी पावसामुळे एका 8 वर्षीय चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये अंगावर विज पडून 8 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

काय घडले नेमके?
लावण्या हनुमंता माशाळे असे मृत पावलेल्या 8 वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात मन हेलावून टाकणारी घटना घडली. मुस्ती गावातील शेतात अंगावर वीज पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंगावर वीज पडल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

चिमुकलीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजताच तिच्या नातेवाईकांनी सरकारी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात आक्रोश केला. अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident News : जवानांच्या बसचा भीषण अपघात; 10 जण गंभीर जखमी

Loksabha : मतदानाच्या दुसऱ्या दिवशी भाजपच्या ‘या’ उमेदवाराचं निधन

Weather Update : पुणे जिल्ह्यात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

Lok Sabha Elections : प्रकाश आंबेडकर यांना अमरावतीमध्ये मोठा धक्का !

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रॅव्हल्सला भीषण आग

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!