नाशिक : भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नाशिकमध्ये येणार आहेत. यानिमित्त नाशिक काँग्रेसकडून राहुल गांधींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु आहे. त्यातच आता राहुल गांधी यांना राजीव गांधींप्रमाणेचे बॉम्बने उडवून देण्याचा कॉल काही दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांना आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.
राहुल गांधी यांना राजीव गांधींप्रमाणेचे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा फोन नाशिक पोलीस आयुक्तालयात आठ दिवसांपूर्वी आला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चौकशी करत धमकी देणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. तो माथेफिरू असल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती नाशिक पोलिसांनी केंद्रीय तपास यंत्रणांना दिली असून संबंधित व्यक्तीवर पोलसांची नजर कायम आहे.
राहुल गांधींच्या सुरक्षेत वाढ
गेल्या दहा वर्षांपासून त्या व्यक्तीला दारू पिण्याचे व्यसन आहे. व्यक्तीने फोन हा दारूच्या नशेत केला होता. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. संपूर्ण अहवाल केंद्रीय तपास यंत्रणांना पाठवण्यात आला आहे. तसेच राहुल गांधींच्या दौऱ्याबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Loksabha 2024: महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघात यंदा तब्बल 250+ उमेदवार?
Vasai News : धक्कादायक ! वसईत स्कूल बसने दोन मुलींना चिरडलं
Maharashtra Politics : महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद ‘या’ जागांवर अजूनही एकमत नाही
Manoj Jarange : जरांगे पाटलांची प्रकृती अचानक खालावली; डॉक्टरांचं पथक मध्यरात्री अंतरवालीत दाखल
Weather Update : राज्यात आज पावसाची दाट शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट
Pension : निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा