देहूनगरीमध्ये आजपासून मांस, मच्छी विक्री आणि नदीतील मासे पकडण्यास बंदी

2668 0

पिंपरी – आज, शुक्रवार १ एप्रिलपासून श्रीक्षेत्र देहू नगरीत मांस, मच्छी विक्री आणि इंद्रायणी नदीतील मासे पकडण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचा ठराव फेब्रुवारी महिन्यात झालेल्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे.

देहू हे तीर्थक्षेत्र असून, लाखो वारकरी देहूत दाखल होऊन संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेत असतात. वारकरी परंपरा आणि तीर्थक्षेत्र असल्याने देहूत मांस, मच्छी विक्री आणि इंद्रायणी नदीतील मासे पकडण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.आजपासून या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास थेट पोलीस कारवाई होणार आहे. या निर्णयामुळे देहूनगरी शुद्ध शाकाहारी बनली आहे.

याआधी ग्रामपंचायतीनेसुद्धा हा निर्णय घेतला होता. मात्र ग्रामपंचायत बरखास्त झाली आणि कोरोनाचाही काळ सुरू झाला. त्यामुळे प्रशासक असताना मांस, मच्छी विक्री सुरू झाली.

Share This News
error: Content is protected !!