पुणे : पुण्यातील विमाननगर (Pune Blast) परिसरात 10 गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण विमाननगर हादरलं आहे. विमाननगरमधील सिंबोयसेस कॉलेजजवळ रोहन मिथिला इमारतीलगत सिलेंडरचा स्फोट होऊन ही भीषण दुर्घटना घडली. आज दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
रोहन मिथिला इमारतीलगत घटनास्थळी 100 गॅस सिलेंडर होते. त्यापैकी एकापाठोपाठ 10 सिलेंडरचा स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामन दलाच्या जवानांना यश आले आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाली की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दिनांक 27 डिसेंबर रोजी दुपारी 02.40 वाजता विमान नगर येथे सिंबायोसिस कॉलेज, रोहन मिथिला इमारतीलगत असणारया होरिझन डेव्हलपर्स, निऑन साईटस् याठिकाणी कामगारांच्या पञ्याच्या शेड असलेली घरे होती. शेजारील एका पञा बांधकामाच्या ठिकाणी सुमारे 100 च्या आसपास घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरचा साठा होता. त्याठिकाणी अंदाजे 10 ते 12 सिलेंडर फुटल्याने आग लागली होती. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाची वाहने वेळेत पोहोचत आग अगदी वेळेत विझवल्याने मोठा धोका टळला असून सुदैवाने कोणी जखमी नाही. अग्निशमन दलाचे वाहन पोहोचले तेव्हा ही दोन सिलेंडरचे स्फोट झाले. परंतू सदर सिलेंडर साठा कोणाचा याबाबत अजून माहिती मिळू शकली नाही. सद्यस्थितीत आग विझली असून कुलिंगचे काम सुरू आहे. अग्निशमन दलाची वाहने वेळेत पोहोचल्याने व दुपारची वेळ असल्याने तिथे कामगार नव्हते. त्यामुळे सुदैवाने जखमी वा जिवितहानी टळली असून जर ही घटना राञीच्या वेळी घडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.
देवेंद्र पोटफोडे
मुख्य अग्निशमन अधिकारी
पुणे महानगरपालिका
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Shikhar Dhawan : गब्बरने आपल्या मुलासाठी लिहिली काळीज चिरणारी पोस्ट; वाचून तुम्हीदेखील व्हाल भावुक
Nagaraj Naidu : ज्येष्ठ पत्रकार नागराज नायडू यांचे निधन
Satara Crime : सातारा हादरलं ! मनातल्या ‘त्या’ भीतीपायी वडिलांनी पोटच्या लेकराचा घेतला जीव
Accident News : दाट धुक्याने केला घात! 3 बस, 2 कार अन् ट्रकचा विचित्र अपघात
Punit Balan : पुनित बालन ग्रुप ईगल्सने पटकावले वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले YouTube वर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे जगातील पहिले नेते
RBI Threat : खळबळजनक ! मुंबईतील RBI चे मुख्यालय उडवून देण्याची मेलद्वारे देण्यात आली धमकी