जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरमधून एक धक्कादायक घटना (Accident Video) समोर आली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. नाईटक्लबच्या बाहेर सुरु असलेल्या भांडणादम्यान चालकाने कारसमोर उभ्या राहिलेल्या दोघांना उडवलं आणि त्यांच्या अंगावर गाडी घालून निघून गेला. ही धक्कादायक घटना नाईटक्लबच्या बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. दोघांना कारने चिरडल्यानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. हिट अँड रन प्रकरणात तरुणीचा मृत्यू झाला असून तरुण जखमी झाला आहे.
काय घडले नेमके?
उमा असं मृत झालेल्या तरुणीचं नाव आहे. ती मूळची मध्य प्रदेशची असून जयपूरमध्ये राहत होती. ती इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करायची. मंगळवारी रात्री ती आपल्या मित्रांसह नाईटक्लबमधून बाहेर आली असता वाद झाला. बाहेर उभ्या दांपत्यासह त्यांचा शाब्दिक वाद झाला. सीसीटीव्हीत कारच्या बाहेर उभे राहून उमा आणि तिचा मित्र भांडताना दिसत आहेत. यावेळी कारमध्ये बसलेलं दांपत्य तेथून निघण्याचा प्रयत्न करत होतं. याचवेळी एक तरुण कारसमोर जाऊन उभा राहतो. तर उमाचा हात एकाने पकडला होता. तो तिला रोखण्याचा प्रयत्न करत होता.
Yesterday, a disturbing incident unfolded in Jaipur's well-known Malviya Nagar area, where a car deliberately caused the death of a girl and inflicted injuries on a boy.
https://t.co/cOa2DXe3UgThe alleged perpetrator, Mangesh Arora is currently absconding.
I urge…
— Divya Gandotra Tandon (@divya_gandotra) December 27, 2023
कारमसोर तरुण उभा असल्याने चालक गाडी थांबवेल असे वाटत होते मात्र कारचालकाने गाडी न थांबवता थेट या दोघांना उडवले. यादरम्यान उमा कारच्या खाली येते. मात्र तरीदेखील कारचालक थांबत नाही आणि गाडी घेऊन घटनास्थळावरून फरार होतो. या अपघातात उमाचा मृत्यू झाला असून, तरुण गंभीर जखमी आहे. पोलिसांकडून आरोपी कार चालकाचा शोध सुरु आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Shikhar Dhawan : गब्बरने आपल्या मुलासाठी लिहिली काळीज चिरणारी पोस्ट; वाचून तुम्हीदेखील व्हाल भावुक
Nagaraj Naidu : ज्येष्ठ पत्रकार नागराज नायडू यांचे निधन
Satara Crime : सातारा हादरलं ! मनातल्या ‘त्या’ भीतीपायी वडिलांनी पोटच्या लेकराचा घेतला जीव
Accident News : दाट धुक्याने केला घात! 3 बस, 2 कार अन् ट्रकचा विचित्र अपघात
Punit Balan : पुनित बालन ग्रुप ईगल्सने पटकावले वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले YouTube वर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे जगातील पहिले नेते
RBI Threat : खळबळजनक ! मुंबईतील RBI चे मुख्यालय उडवून देण्याची मेलद्वारे देण्यात आली धमकी