पुणे : पुण्यात (Pune News) सुरु असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवात आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. कार्यक्रमाच्या मंडपाच्या मागील बाजूस फोटोगॅलरी असलेल्या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे. कार्यक्रम सुरु असताना अचानक आग लागल्याने प्रेक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
आज महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे. मात्र फार मोठी आग नसल्याने आगीवर लवकर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सविस्तर माहिती अशी कि सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा दरम्यान आज दिनांक १७•१२•२०२३ रोजी ठिक दुपारी ०४•१५ वाजता कार्यक्रमसथळी असणारया इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन मंडपामधील कापडाने पेट घेतला होता. तिथेच उपस्थित असलेले नागरिक केदार केळकर यांनी अग्निरोधक उपकरणचा (फायर एक्स्टिंग्युशर) वापर करुन आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतू, त्याचवेळी घटनास्थळी बंदोबस्तावर तैनात असलेली अग्निशमन दलाची फायरगाडी व जवान यांनी तातडीने वेळीच आगीवर नियंञण मिळवत आग इतरञ पसरु न दिल्याने मोठा धोका टळला असून आग पुर्ण विझली आहे. या घटनेमध्ये मंडपाच्या ठिकाणी असलेले कापड जळाले असून इतर कोठे ही आग पसरली नाही.या कामगिरीत बंदोबस्तावर तैनात असलेले अग्निशमन दलाचे वाहन चालक बिजू वाघमारे व जवान संदिप घडशी, रवी बारटक्के, ज्ञानल तारु, अक्षय चव्हाण यांनी सहभाग घेतला.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Raj Thackeray : राज ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ शिलेदाराने साथ सोडत शिवसेनेत केला प्रवेश
Chandrakant Patil : भाजपाचे पद म्हणजे जबाबदारी आणि अपेक्षा! – नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन
Ranbir Kapoor : ‘ॲनिमल’च्या पुढच्या भागात ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार रणबीर कपूर
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी केल्या ‘या’ 10 प्रमुख मागण्या
Viral Video : खोपोलीत बसमध्ये महिला वाहक आणि प्रवाशामध्ये फ्री स्टाईल हाणामारी
Sajjan Jindal: JSW समूहाचे एमडी सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप
Nagpur News : नागपुरमधील सोलर कंपनीत भीषण स्फोट; 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू
Parbhani News : देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; 3 भाविकांचा मृत्यू
Accident News : भरधाव ट्रक दुकानांत घुसल्याने भीषण अपघात; 3 ठार