Cough Syrup

Shocking News : धक्कादायक ! खोकल्याचे औषध घेतल्याने 5 जणांचा मृत्यू

2601 0

नडियाद – गुजरातच्या खेडा जिल्ह्यामधून एक धक्कादायक (Shocking News) बातमी समोर आली आहे. यामध्ये मिथाईल अल्कोहोलचा अंश असलेले आयुर्वेदिक कफ सिरफ घेतल्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या कफ सिरपची विक्री करणाऱ्या दुकानदारासह तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
नडियाद येथील बिलोदरा या गावातील एका औषधाच्या दुकानातून कालमेघासव-आसवअरिष्ट या नावाचे आयुर्वेदिक कफ सिरप किमान 50 जणांना विकण्यात आले आहे. हे सिरप घेतलेल्या गावकऱ्यांच्या रक्ताचा नमुना तपासण्यात आला. या कफ सिरपमध्ये मिथाईल अल्कोहोल असल्याचे या नमुन्याच्या तपासणीत आढळून आले असल्याची माहिती खेडाचे पोलिस अधीक्षक राजेश गाढिया यांनी दिली.

हे कफ सिरप घेतलेल्यांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आणखी दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिथाईल अल्कोहोल हे विषारी द्रव्य असून, ते मिसळलेले कफ सिरप प्यायल्याने 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गुजरात पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update: राज्यात आजही कोसळणार पाऊस; ‘या’ भागांत विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा

Dr. Vinayak Kale : ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती

Sanjay Raut : राज्यात नामर्दांचं सरकार, गद्दारांसाठी वेगळा कायदा; संजय राऊत यांची सरकारवर टीका

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी घातला टीपू सुलतानच्या फोटोला हार; Video व्हायरल

Wardha Accident : वर्ध्यात कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात

Viral Video : खतरनाक ! पिसाळलेल्या बैलाने घरात घुसून महिलांना उडवले

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!