Immunity

Immunity : थंडीत ‘या’ प्रकारे वाढवा आपली रोगप्रतिकारक शक्ती; सगळे आजार पळतील दूर

501 0

गेल्या काही दिवसांपासून हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल (Immunity) पाहायला मिळत आहे. नोव्हेंबर महिना संपत आला तरी अजून कुठेच थंडीची चाहूल लागलेली नाही. या दरम्यान उन्हाचा तडाखा आणि पाऊस अनुभवायला मिळत आहे. यामुळे आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. सर्दी, खोकला, ताप यासारखे साथीचे आजार पसरत आहे. यावेळी आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती महत्त्वाची भूमिका बजावत असते.

इम्युनिटी म्हणजे काय?
शरीरात रोगांपासून संरक्षण करण्यासाठी एक नैसर्गिक प्रणाली असते, ज्याला रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) म्हणतात. जर तुम्हाला वारंवार खोकला, सर्दी, संसर्ग, अशक्तपणा जाणवत असेल तर याचा अर्थ तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली आहे. हि रोगप्रतिकारक शक्ती चांगली असली तर तुम्हाला आजार होण्याची शक्यता कमी असते. चला तर आज आपण ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय करावे याची माहिती घेणार आहोत.

1) नैसर्गिक रस
हळद, आवळा आणि आल्याचा ताजा रस नियमित प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. 4 इंच ताजी हळद, 2 आवळे, 2 इंच ताजे आले सोलून 50 मिली पाण्यात मिसळा. गाळून घ्या, चवीनुसार काळी मिरी आणि मीठ घालून नियमित प्या.

2) व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन सी केवळ प्रतिकारशक्तीच वाढवत नाही तर व्हायरस आणि बॅक्टेरियांना मारणाऱ्या पांढऱ्या रक्त पेशी देखील वाढवते. संत्रा, आवळा, ब्रोकोली, अननस, फ्लॉवर, कोबी आणि रताळ्यामध्ये हे जीवनसत्व सहज मिळते.

3) अनेकजण लसूण आणि आलं जेवणातून बाहेर काढून टाकतात. या दोन्ही गोष्टी अनेक धोकादायक जीवाणू आणि विषाणूंविरुद्ध लढतात. यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. लसणाच्या 4-5 कच्च्या पाकळ्या रोज खाव्यात. दुसरीकडे, सकाळी तुम्ही आल्याचा चहा किंवा आल्याचा रस मध आणि कोमट पाण्यासोबत घेऊ शकता.

4) हिवाळ्यात मुळा खा
थंडीमध्ये सायनस, नाक बंद होणे, श्लेष्मा, मायग्रेन यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. मुळा खाल्ल्याने या सर्व समस्या दूर होतात.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Datta Dalvi Arrested : ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक

Maruti Navale : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर गुन्हा दाखल

Cylinder Blast : चेंबूरमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; 4-5 घरे आगीच्या भक्षस्थानी

Datta Dalvi : दत्ता दळवी नेमके आहेत तरी कोण?

Pune News : भारत गौरव यात्रा रेल्वे मध्ये 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा

Uttarakhand Silkyara Tunnel : सध्या चर्चेत असलेले अरनॉल्ड डिक्स कोण आहेत?

Team India Head Coach : BCCI ने टीम इंडियाच्या हेड कोचचे नाव केले जाहीर; ‘या’ दिग्गज खेळाडूकडे सोपवली टीमची कमान

Maharashtra Cabinet Decision : आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ मोठे निर्णय

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!