भले बुरे जे घडून गेले जरा विसावू या वळणावर

240 0

पुणे महापालिकेच्या निवडणुका होईपर्यंत आजपासून महापालिकेत प्रशासकराज सुरू होणार आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी महापालिकेची निरोपाची ऑनलाइन सभा पार पडली. महापालिकेच्या अखेरच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधकांकडून पाच वर्षांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. 

एरवी एकमेकांना आरोपांच्या फैरी झाडणारे सर्वपक्षीय नगरसेवक काल अखेरच्या दिवशी मैत्रीपूर्ण वातावरणात एकमेकांना निरोप देताना दिसून आले.सुमारे 100 हून अधिक नगरसेवक एकमेकांसोबत फोटो काढत 5 वर्षातील चांगल्या-वाईट आठवणींना उजाळा देताना दिसून आले.आजपासून पुणे महानगरपालिकेची मुदत संपत असून पालिका आयुक्त विक्रम कुमार प्रशासक म्हणून सूत्र हातात घेणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!