हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयानं दिला आहे.
शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचे स्पष्ट करत मुस्लिम विद्यार्थीनींनी शाळा, कॉलेजमध्ये हिजाब घालण्यास परवानगी देण्याची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी आज कर्नाटकच्या काही जिल्ह्यांमध्ये १४४ कलम लागू करण्यात आला होता, जेणेकरून कोणतीही हिंसा उफाळून येऊ नये.
नेमका काय आहे हिजाब वाद ?
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात जानेवारी महिन्यात हिजाब घालण्यावरून वाद सुरू झाला. उडुपी येथील कॉलेजमधील काही विद्यार्थींनींनी हिजाब घालून वर्गात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र त्यांना अडवण्यात आले. कॉलेज प्रशासनाने ड्रेसमध्ये समानता असावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. पण यावरून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाद वाढत गेला. याप्रकरणी विद्यार्थींनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या हिजाब वादाचे पडसाद संपूर्ण देशभरात यला मिळाले. काही शाळेत हिजाबच्या समर्थनार्थ आणि विरोध आंदोलन केले गेले. एवढेच नाही तर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते.