केवळ 20 सेकंदात हृदयविकाराचे निदान

617 0

अमेरिकेत दरवर्षी 12 लाखांपेक्षाही अधिक लोक हृदयविकारामुळे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग स्कॅन करतात. एमआरआय करवून घेण्यासाठी सध्या 45 ते 90 मिनिटांचा वेळ लागतो. मात्र, ब्रिटिश वैज्ञानिकांनी आता हा कालावधी अनेक पटींनी कमी केला आहे.

ब्रिटन हार्ट फाउंडेशनने आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून हे नवे एमआरआय मशीन डिझाईन केले आहे. त्याच्या मदतीने केवळ वीस सेकंदामध्येच कोणत्याही प्रकारचा हृदयविकार किंवा हार्ट ब्लॉकेज चा छडा लावता येऊ शकतो.विशेष म्हणजे या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सामान्य चेकपच्या तुलनेत 13 मिनिटांचा वेळ वाचतो. याचा अर्थ चाळीस पट वेगाने हृदयाचे संपूर्ण स्कॅनिंग होऊ शकते. सध्या या तंत्राचा वापर लंडन युनिव्हर्सिटीच्या हॉस्पिटलमध्ये केला जात आहे.

Share This News
error: Content is protected !!