पुण्यात महिला बाऊन्सरकडून पालकास मारहाण; बिबवेवाडीच्या क्लाईन मेमोरियल शाळेतील घटना

803 0

पुणे- बिबवेवाडी परिसरातील क्लाईन मेमोरियल स्कूलमध्ये महिला बाऊन्सरकडून पालकांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा संपूर्ण प्रकार मोबाइलच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित करण्यात आला आहे. या प्रकरणी शाळेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी पालक मंगेश गायकवाड (वय 49) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, मंगेश पांडुरंग गायकवाड यांचा मुलगा संबंधित शाळेत शिक्षण घेतो. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलाची फी भरण्यासाठ त्यांना पत्र दिलं होतं. त्यावर खुलासा देण्यासाठी तक्रारदार आणि इतर काही पालक शाळेत आले होते. या पालकांनी मुख्याध्यापकांकडे लेखी म्हणणं दिल्यानंतर त्याची पोच पावती मागितली. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी महिला बाऊंसरला बोलावून मारहाण करायला लावल्याचा आरोप मंगेश गायकवाड यांनी केला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!