पुण्यात महिला बाऊन्सरकडून पालकास मारहाण; बिबवेवाडीच्या क्लाईन मेमोरियल शाळेतील घटना

608 0

पुणे- बिबवेवाडी परिसरातील क्लाईन मेमोरियल स्कूलमध्ये महिला बाऊन्सरकडून पालकांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा संपूर्ण प्रकार मोबाइलच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित करण्यात आला आहे. या प्रकरणी शाळेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी पालक मंगेश गायकवाड (वय 49) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, मंगेश पांडुरंग गायकवाड यांचा मुलगा संबंधित शाळेत शिक्षण घेतो. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलाची फी भरण्यासाठ त्यांना पत्र दिलं होतं. त्यावर खुलासा देण्यासाठी तक्रारदार आणि इतर काही पालक शाळेत आले होते. या पालकांनी मुख्याध्यापकांकडे लेखी म्हणणं दिल्यानंतर त्याची पोच पावती मागितली. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी महिला बाऊंसरला बोलावून मारहाण करायला लावल्याचा आरोप मंगेश गायकवाड यांनी केला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

Solapur Accident

Solapur Accident : तुळजापूरला निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Posted by - August 23, 2023 0
सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर (Solapur Accident) एक भीषण अपघात झाला आहे. मोहोळजवळील (Solapur Accident) यावली गावानजीक माल ट्रक व कारच्या…

#PUNE : भरोसा सेलमध्ये पत्नी पीडित पुरुषांच्या चित्रविचित्र तक्रारी; रोज दोन पुरुषांचे करावे लागते समुपदेशन

Posted by - March 20, 2023 0
पुणे : आतापर्यंत महिलांच्या पतीविरुद्ध आणि सासरकडचं विरुद्ध अनेक तक्रारी ऐकल्या आणि वाचल्या असतील. परंतु पत्नीपीडित पुरुषांच्या देखील भरोसा सेल…
Mumbai Airport

गेल्या 12 तासांपासून मुंबई एअरपोर्टवर अडकले 300हून अधिक प्रवासी

Posted by - May 26, 2023 0
मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) मोठी गर्दी आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झाले…

ॲड. प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी पिंपरीत जाहीर विराट सभा

Posted by - October 11, 2022 0
पुणे : धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यानिमित्त 15 ऑक्टोंबर 2022 रोजी पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटिक्स (एच.ए) च्या प्रंचड मोठे असणाऱ्या मैदानात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *