Lokmanya Tilak Award

Lokmanya Tilak Award : मोदींना प्रदान केलेला लोकमान्य टिळक पुरस्काराचे काय आहे स्वरूप आणि इतिहास?

1023 0

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी साडेदहाच्या सुमारास पुण्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन पूजा केली. यानंतर मोदी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला (Lokmanya Tilak Award) उपस्थित राहिले. यावेळी त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र आज पंतप्रधान मोदींना ज्या पुरस्काराने सन्मानित केले गेले त्याचे स्वरूप आणि इतिहास तुम्हाला माहित आहे का? या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात कधी झाली होती? हा पुरस्कार कोणाकोणाला मिळाला आहे? हा पुरस्कार किती महत्त्वाचा आहे? या सगळ्यांची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

‘या’ पुरस्काराचं नेमकं स्वरूप काय आहे?
पंतप्रधान मोदी त्या अनन्यसाधारण नेतृत्व आहे. लोकांमध्ये देशभक्तीची भावना वाढीस लागावी म्हणून मोदींनी महत्त्वाचं काम केलं आहे. मोदींच्या या प्रयत्नांचा सन्मान करण्यासाठी यंदाच्या 41 व्या पुरस्कार सोहळ्यात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे, असं ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे. या पुरस्काराचं स्वरुप स्मृतीचिन्ह, एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे आहे.

कधीपासून दिला जातो हा पुरस्कार?
पंतप्रधान मोदींना दिल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची सुरुवात 1983 रोजी टिळक स्मारक मंदिर ट्रस्टने केली. हा पुरस्कार दरवर्षी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या दिवशी प्रदान केला जातो.

ट्रस्टमध्ये कोणाकोणाचा आहे समावेश?
टिळक स्मारक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष लोकमान्य टिळकांचे पणतू दीपक टिळक आहेत. टिळक हे काँग्रेस समर्थक म्हणून ओळखले जातात. लोकमान्य टिळकांनीच काँग्रेसला लोकांपर्यंत नेण्यासाठी बरेच प्रयत्न केल्याचे दाखले दिले जातात.

आतापर्यंत कोणाकोणाला देण्यात आला आहे हा पुरस्कार?
पंतप्रधान मोदींच्या आधी हा पुरस्कार माजी राष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा आणि प्रणब मुखर्जींना प्रदान करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग यांनादेखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच एस. एम जोशी, शरद पवार त्याशिवाय प्रसिद्ध उद्योजक आर. नारायणमूर्ती, मेट्रोमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या ई. श्रीधरन यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. आतापर्यंत एकूण 40 जणांना हा पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!