PMPML Accident

PMPML Accident : पुणे-नगर रोडवर PMPML च्या दोन बसची समोरासमोर धडक; काचा फोडून प्रवाशांना काढलं बाहेर

739 0

पुणे : पुणे शहरात PMPML च्या दोन बसची समोरासमोर धडक होऊन अपघात (PMPML Accident) झाला आहे. आज सकाळी चंदन नगर येथील बीआरटी लेन मध्ये PMPML च्या दोन बसेस समोर (PMPML Accident) एकमेकांना धडकून हा अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही बस मध्ये प्रवास करणारे जवळपास 29 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी मध्ये दोन्ही बसच्या चालकांचा देखील समावेश आहे.

कात्रज वरून वाघोलीला जाणारी ओलेक्ट्रा इलेक्ट्रॉनिक बस आणि तळेगाव ढमढेरे वरून पुणे मनपाला जाणारी सीएनजी बस या दोन्ही बस मध्ये हा अपघात झाला आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ओलेक्ट्रा बस चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पीएमपीएमएल महामंडळाकडून देण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!