Vijay-Wadettiwar

Vijay Wadettiwar : ना थोरात, ना पटोले ‘या’ नेत्याकडे काँग्रेस हायकमांडने सोपवली विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी

1032 0

मुंबई : पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधी पक्षनेत्याची निवड रखडली होती. आता अखेर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी (Vijay Wadettiwar) निवड करण्यात आली आहे. विजय वडेट्टीवार यांची दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे.

यामध्ये विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या (Congress) दुसऱ्या फळीतील नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा होती.

प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले कायम
नाना पटोले हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार आहेत, तर बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे गटनेते राहणार आहेत, त्यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे समोर आले आहे.

Share This News
error: Content is protected !!