डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बीएमसी महाविद्यालयात उद्योजकता विकास विभागाची स्थापना

358 0

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात उद्योजकता विकास विभागाची स्थापना करण्यात आली. उद्योजक इंद्रनील चितळे यांच्या हस्ते या विभागाची स्थापना करण्यात आली.

यशस्वी उद्योजक होण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि संयम या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याची आवश्यकता असल्याचे मत चितळे यांनी व्यकत्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित होत्या. विभाग प्रमुख डॉ. प्रीती राजगुरु यांनी प्रास्ताविक, युगंधरा पाटील यांनी सूत्रसंचालन, सिद्धी तन्ना यांनी परिचय आणि श्रेया छाबरा यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले

Share This News
error: Content is protected !!