महिला दिन विशेष ; प्रत्येक भारतीय महिलेला ‘हे’ कायदे माहिती असायलाच हवेत…

406 0

दरवर्षी 8 मार्च जागतिक महिला दिन आजच्या जागतिक माहिला दिनानिमित्त जाणून घेऊयात महिलांना ठाऊक हव्या अशा महत्वाच्या कायद्यांबद्दलची ही खास माहिती

1. मोफत कायदेशीर मदत : प्रत्येक महिलेला हे माहितीच असलं पाहिजे की, मोफत कायदेशीर मदत म्हणजेच कायदेशीर सल्लागार (वकिल) मिळवण्याचा तिला अधिकार आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर तिने अशी मागणी करायलाच हवी.

2. पुरुषाइतकंच वेतन: एकसमान कामासाठी स्त्री किंवा पुरुषांची नोकरभरती करताना कोणत्याही कंपनीला वा मालकाला पुरुषाच्या तुलनेत स्त्रीला कमी वेतन देण्याचा भेदभाव करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला पुरुषा इतकंच समान वेतन मिळण्याचा हक्क आहे.

3. लैंगिक छळाविरूद्धचा कायदा : लैंगिक छळ (प्रतिबंधक) कायदा 2033च्या अनुसार, दहापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनेत किंवा कंपनीत ‘अंतर्गत तक्रार समिती’ स्थापन करणे बंधनकारक आहे. महिला कर्मचाऱ्यांची लैंगिक छळाची तक्रार दाखल करुन घेणे, त्या तक्रारींची चौकशी करणे, दंड ठोठावणे हे या समितीचे प्रमुख कार्य आहे.

4. महिला पोलीस कर्मचारीच महिलेला अटक करु शकतात : फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर) कलम 46(1) अनुसार, कोणत्याही महिलेला पुरुष पोलीस अधिकारी अटक करु शकत नाही. एखाद्या महिलेला कोणत्याही कारणास्तव अटक करायची असेल तर महिला पोलीस अधिकारी वा कर्मचारीच ते करू शकतात.

5. पालकांच्या संपत्तीत वाटा : हिंदू वारसा (सुधारित) कायदा 2005 अनुसार, मुलाप्रमाणे मुलीलाही तिच्या पालकांच्या संपत्तीत वाटा मिळण्याचा अधिकार आहे. पालकांनी जर मृत्यूपत्र केलेलं नसेल तर त्यांच्या संपत्तीत मुलाचा आणि मुलीचा वाटा समसमान असेल.

6. स्वत:ची ओळख गुप्त ठेवणे : लैंगिक छळ कायदाच्या कलम 16 अनुसार, ज्या महिलेचा लैंगिक छळ झाला आहे अशा पीडित महिलेला तिच्या नावाबाबत गुप्तता बाळगण्याचा अधिकार आहे.

Share This News
error: Content is protected !!