Congress

Congress : विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून ‘या’ 4 नेत्यांच्या नावाची चर्चा

1026 0

मुंबई : काँग्रेसच्या (Congress) गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या (Congress) दुसऱ्या फळीतील नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि संग्राम थोपटे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरु आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंड केल्यामुळे राष्ट्रवादीचं संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात आला आहे.

Ajit Pawar : अजित पवारांसह 9 मंत्री शरद पवारांच्या भेटीला

संधी कोणाला मिळणार?
काँग्रेसनं (Congress) विरोधी पक्षनेतेपदावर दावा केल्यानंतर काँग्रेसमधून कोणाला संधी मिळणार याबाबत आता सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या पदासाठी सध्या सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि संग्राम थोपटे या काँग्रेस नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये सिंध नदीत कोसळून CRPF जवानांच्या गाडीचा अपघात; 8 जवान जखमी

प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले कायम
नाना पटोले हे काँग्रेसच्या (Congress) प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार आहेत, तर बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे गटनेते राहणार आहेत, त्यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे समोर आले आहे.

Share This News
error: Content is protected !!