श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या (Jammu And Kashmir) गांदरबल जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये (Jammu And Kashmir) CRPF जवानांच्या गाडीचा अपघात झाला आहे. ही गाडी आज सकाळी सिंध नदीत कोसळली. या अपघातात अपघातात 8 जवान जखमी झाले आहेत. सीआरपीएफचे जवान बालटालच्या रस्त्याने अमरनाथ गुहा मंदिराच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.
अपघातात जखमी सीआरपीएफ कर्मचाऱ्यांना वाहनातून बाहेर काढून त्यांना बालटाल इथल्या बेस शिबिराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गांदरबलच्या बटाल भागात नीलग्रार हेलिपॅडजवळ हा अपघात झाला आहे. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी मोठ्या संख्येने सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. अमरानथ यात्रेचा काळ वगळता इतर दिवशीही सुरक्षा व्यवस्था तैनात असते.
हिमालयात 3 हजार 888 मीटर उंचीवर गुहेत मंदिर असून वर्षात 62 दिवसांची वार्षिक तीर्थयात्रा सुरू झाली आहे. ही यात्रा 1 जुलै ते 31 ऑगस्ट या कालावधीत सुरू राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.