मुंबई : 5 ऑक्टोबर पासून आयसीसी वनडे मेन्स वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) ला सुरुवात होणार आहे. आयसीसीने 2023 वर्ल्ड कपचं (World Cup 2023) वेळापत्रक आज जाहीर केले आहे. भारतातील 10 शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने खेळवण्यात येणार आहेत. यावेळचे सगळे सामने नेहमीच्या फॉरमॅटमध्ये न खेळवता वर्ल्ड कप राउंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहेत. या वर्ल्डकपच्या आधी भारताचा माजी ओपनर वीरेंद्र सेहवागने एक भविष्यवाणी केली आहे.
काय केली भविष्यवाणी ?
या वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त रन विराट कोहली, रोहित शर्मा आणि डेविड वॉर्नर हे खेळाडू बनवतील. एका कार्यक्रमात विरेंद्र सेहवागला विराट कोहली सचिन तेंडुलकरच्या वर्ल्डकप मधील सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड तोडू शकतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला मला विराट कडून खूप आशा आहे, तो हा रेकॉर्ड तोडू शकतो, असं विरेंद्र सेहवागने भविष्यवाणीत म्हटलं आहे.
या दोन टीम पोहोचतील फायनलमध्ये?
वर्ल्ड कप फायनलमध्ये (World Cup 2023) भारत आणि ऑस्ट्रेलिया पोहचू शकतात. या दोन्ही टीममध्ये फायनल सामना होऊ शकतो असे वीरेंद्र सेहवाग म्हणाला आहे. तर श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुरलीधरन यानेही अशीच भविष्यवाणी केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाला वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे असे तो म्हणाला आहे.