Geeta Jain

Geeta Jain : आमदार गीता जैन यांनी पालिका अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणी प्रकरणात ‘ही’ मोठी अपडेट आली समोर

698 0

ठाणे : आमदार गीता जैन (Geeta Jain) यांनी 20 जून रोजी पालिका अभियंत्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. पेंकरपाडा भागात एका नागरिकाने घरात केलेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेनं कारवाई केली. हे बांधकाम हा नागरिक स्वत: तोडण्यास तयार असताना पालिकेनं का कारवाई केली? असा सवाल स्थानिक आमदार गीता जैन यांनी केला होता. याचवेळी बोलताना जैन (Geeta Jain)  यांना राग अनावर झाल्याने त्यांनी अभियंत्याच्या कानशिलात लगावली होती. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यावरून आमदार गीता जैन यांच्यवर टीकादेखील करण्यात आली होती.

Court Summons : उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना सन्मस. 14 जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

ही अपडेट आली समोर?
मिरा-भाईंदर महापालिकेच्या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याला मारहाण झाल्याप्रकरणात आमदार गीता जैन यांच्याविरोधात मंगळवारी रात्री उशिरा काशी मिरा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी अर्ज करण्यात आला. कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांनी मारहाण प्रकरणी आमदार गीता जैन यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीदेखील त्यांनी या पत्रात केली होती. मात्र आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अपक्ष आमदार गीता जैन यांच्याविरोधात काशीमीरा पोलीस ठाण्यात तोडगा काढण्याची मागणी करणारे अभियंता शुभम पाटील यांनी गीता जैन यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली आहे.

Share This News

Related Post

VIDEO : मेदनकरवाडीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची सुपारी देऊन हत्या; पतीसह तिचा खून करणाऱ्या तिघांना अटक

Posted by - October 14, 2022 0
चाकण : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची एक लाख रुपयांना सुपारी देऊन हत्या करणाऱ्या पतीला तसेच सुपारी घेऊन तिचा खून करणाऱ्या तीन…

#Social Media Influencer : तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहात का ? केंद्र सरकारने जाहीर केलेली ही नियमावली वाचा; अन्यथा होऊ शकतो 50 लाखाचा दंड

Posted by - January 23, 2023 0
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक इन्फ्लुएन्सर तयार होत आहेत. वेगवेगळे प्रोडक्ट्स विषयी माहिती देताना मात्र आता या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला…

#ACCIDENT : पिंपरी चिंचवडमध्ये विचित्र अपघात; थरकाप उडवणारं सीसीटीव्ही फुटेज समोर

Posted by - March 11, 2023 0
पिंपरी चिंचवड : सकाळी फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडलेल्या 47 वर्षीय व्यक्तीला एका भरदार कारने जोरदार धडक दिली आहे. या धडकेमध्ये…

लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा वाजवण्यासाठी 10 हजार स्पीकर्सची ऑर्डर

Posted by - April 15, 2022 0
मुंबई- मशिदीत अजानच्या वेळी लाऊडस्पीकर वाजवण्याच्या विरोधात भाजपने आता लाऊडस्पीकरवरून हनुमान चालिसाचे पठण करून लाऊडस्पीकरला उत्तर देण्याची तयारी केली आहे.…
Ajit Pawar

Ajit Pawar : वादा तोच पण, दादा नवा…! राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झळकलेल्या ‘त्या’ बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा

Posted by - February 20, 2024 0
पुणे : अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. यादरम्यान आता उत्तर पुणे जिल्ह्यात वादा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *