मुंबई : मागील तीन दिवसांपूर्वी राज्यात सर्वत्र मान्सूनचे (Maharashtra Monsoon) आगमन झालं आहे. हवामान खात्याकडून (Maharashtra Monsoon) आज आणि उद्या राज्याला पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरांत, रायगड, कोकण, मराठवाडा, पुणे आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई जिल्यातील काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर , पुणे, नाशिक, ठाणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरामध्ये काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
Monsoon Makeup Tips : पावसाळ्यात मेकअपची कशी घ्याल काळजी?
हवामान विभागाकडून राज्याला ऑरेंज आणि येलो अलर्ट
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे हवामान विभागाने राज्याला 27 आणि 28 जून रोजी पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे आज नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पाऊस, तर मराठवाड्यामध्येदेखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा हवामान खात्याने इशारा दिला आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या ठिकाणी तर विदर्भातही अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . महाराष्ट्रात 29 आणि 30 जूनला हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे .
‘या’ जिल्ह्याना पावसाचा अलर्ट
मुंबईसह, पुणे, संपूर्ण कोकण, ठाणे, मध्य महाराष्ट्र, नाशिक आणि साताऱ्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भाच्या काही भागांतही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर इतर काही भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.