Missing Children

Missing Children : खेळता खेळता कार लॉक झाल्याने तीन चिमुकल्यांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू

487 0

ठाणे : ठाण्यामधून (Thane) एक मन हेलावून टाकणारी घटना (Missing Children) उघडकीस आली आहे. यामध्ये पाचपावली पोलीस ठाण्याच्या (Pachpavali Police Station) हद्दीतील टेका नाका परिसरातून सहा वर्षे वयोगटातील तीन चिमुरड्यांचा (Missing Children) कारमध्ये गुदमरून दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नोएडामध्ये फॅशन शोदरम्यान मोठी दुर्घटना; लोखंडी खांब अंगावर पडून 24 वर्षीय मॉडेलचा जागीच मृत्यू

काय घडले नेमके?
शनिवारी सायंकाळी 6 वर्षे वयोगटातील तीनही मुले टेका नाकाजवळील फारुख मैदानावर (Farooq Maidan) खेळत होते. रात्र झाली तरी घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आजूबाजूच्या परिसरात या मुलांचा शोध घेतला. तसेच त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले मात्र त्या मुलांचा कुठेच पत्ता लागला नाही.

लेकीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या दांपत्यावर काळाचा घाला; पत्नीचा जागीच मृत्यू

यानंतर अधिक तपास केला असता “या मुलांचे मृतदेह फारुख नगर येथील मैदानात पार्क केलेल्या एका जुन्या कारमध्ये सापडले. ही मुलं त्या कारमध्ये खेळत होती. खेळता खेळता अचानक कार लॉक झाल्याने या मुलांना (Missing Children) बाहेर पडता नाही आले. यामुळे या मुलांचा दुर्दैवाने गुदमरून आणि उष्णतेमुळे मृत्यू झाला”, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Commissioner of Police Amitesh Kumar) यांनी दिली. मृत झालेल्या मुलांमध्ये दोन भावंडे आणि त्यांची एक मैत्रीण यांचा समावेश आहे. एकाचवेळी परिसरातील तीन लहान मुलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!