Noida

नोएडामध्ये फॅशन शोदरम्यान मोठी दुर्घटना; लोखंडी खांब अंगावर पडून 24 वर्षीय मॉडेलचा जागीच मृत्यू

409 0

नोएडा : नोएडातील (Noida) सेक्टर-16ए पोलीस स्टेशन हद्दीतील फिल्मसिटीमध्ये (Film City) असलेल्या लक्ष्मी स्टुडिओमध्ये फॅशन शो (Fashion Show) सुरु असताना एक भीषण दुर्घटना घडली. यामध्ये लोखंडी खांब (Iron Pillar) अंगावर कोसळून 24 वर्षीय मॉडेलचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी फॅशन शोच्या आयोजकासह चार जणांना अटक केली आहे.

काय घडले नेमके?
रविवारी (11 जून) दुपारी दीड वाजता फिल्मसिटीच्या लक्ष्मी स्टुडिओमध्ये फॅशन शोचा कार्यक्रम सुरु होता. लायटिंगच्या उद्देशाने लोखंडी खांब उभारण्यात आला होता. पण तो स्टेजवर असलेल्या मॉडेलच्या अंगावर पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. वंशिका चोप्रा वय 24 वर्ष, रा. दिव्यांश फ्लोरा, गौर सिटी-2 असं मृत मॉडेलचं नाव आहे तर बॉबी राज, (रा. गोपाल पुरा, ग्वाल्हेर रोड, आग्रा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून फॅशन शोचा आयोजक आणि लायटिंगच्या कामात सहभागी असलेल्या चार जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे अशी माहिती नोएडाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त मोहन अवस्थी यांनी दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide