Delhi Murder Case

साक्षी मर्डर केसमध्ये मोठी अपडेट; साहिलच्या क्ररतेचा ‘हा’ सगळ्यात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती

744 0

नवी दिल्ली : सगळ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्ली मर्डर केसमध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन अपडेट समोर येत आहे. आता या हत्येप्रकरणी पोलिसांना सगळ्यात मोठा पुरावा हाती लागला आहे. आरोपी साहिल याने साक्षीला ज्या चाकूने निर्दयीपणे तब्बल 21 वेळा भोसकलं तो चाकू अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. यामुळे आता आरोपी साहिलच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

कुठून खरेदी केला होता चाकू
हा इतका भयंकर खून करण्यासाठी साहिलने दिल्लीबाहेरून चाकू खरेदी केला होता. हत्येसाठी त्याने हरिद्वार इथून चाकू आणल्याचा खुलासा आरोपीने केला आहे. या प्रकरणी साहिलच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे. साहिलने चाकूने इतका भीषण हल्ला केला की तिच्या शरीराचे अनेक भाग निकामी झाले होते. वाराच्या जखमांमधून पूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं होतं. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले की, साक्षीचे बहुतेक अवयव निकामी झाले आहेत. अवयव निकामी झाल्याने आणि जास्त रक्तस्त्राव झाल्यानेच तिचा मृत्यू झाला.

Share This News
error: Content is protected !!