जुन्नर : सध्या सगळीकडे लग्नाचा (Wedding) हंगाम सुरु आहे. अनेकजण आपल्या लग्नाचा क्षण खास करण्यासाठी काहीतरी हटके करत असतो. या लग्नातले काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका लग्नातला व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता घोड्यांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
जुन्नर (Junnar) तालुक्यातील खोडद येथील एका लग्न सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या लग्न सोहळ्यात आपल्या मुलाच्या लग्नासाठी एका बैलगाडा मालकाने नवरा नवरीची मिरवणूक घोडी वरून काढली. विशेष म्हणजे मिरवणुकीत सहभागी झालेल्या या दोन्ही घोड्यानी (Horses Dance) पारंपारिक वाद्यांच्या (Traditional Instruments) तालावर ठेका धरला.
पारंपरिक वाद्यांच्या तालावर घोड्यांनी धरला ठेका; Video व्हायरल pic.twitter.com/mK2BEC8x6a
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 2, 2023
व-हाडी मंडळी या दोन्ही घोडींचा डान्स पाहून आवाक झाले. सध्या लग्नामध्ये वेगवेगळे ट्रेंड पाहायला पाहायला मिळत आहेत. मग ती नवरीची बुलेटवरील एन्ट्री असो किंवा लग्न सोहळ्यामधील घोडी डान्स याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.