पुणे जिल्हा दूध संघाची निवडणूक जाहीर ; कधी होणार निवडणूक ?

544 0

पुणे- महाराष्ट्र सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर तब्बल सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक जाहीर झाली आहे.

येत्या 2 मार्चला ही निवडणूक होणार असून सोमवार (दि.14) पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. निवडणुकीसाठी निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद सोबले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जुन्नर, आंबेगाव, खेड ,शिरूर ,मावळ, मुळशी, हवेली, भोर, वेल्हा, पुरंदर आणि दौंड या अकरा तालुक्यांसाठी दूध उत्पादक सोसायटी यांचा प्रत्येकी एका गटातून एक संचालक निवडला जाईल. महिला संचालकासाठी दोन जागा असून , अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती आणि इतर मागास वर्गासाठी प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होईल.

Share This News
error: Content is protected !!