उत्साहाच्या भरात काहीजण बरंच काही बोलून जातात ; अजित पवार यांची कुणाला कोपरखळी ?

235 0

पुणे- पुणे महानगरपालिकेचा प्रारूप प्रभाग आराखडा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीचे 122 नगरसेवक निवडून येतील असा दावा केला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी उत्साहाच्या भरात काहीजण बरंच काही बोलून जातात असं उत्तर देत प्रशांत जगताप यांना कोपरखळी मारली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, मी कधी असा दावा केलेला नाही. बारामतीमध्ये उमेदवारीचा अर्ज भरताना निवडून येण्याची अपेक्षा व्यक्त करतो. कारण कुणाला निवडून द्यायचं ते मतदार ठरवत असतो असे अजित पवार म्हणाले.

यावेळी अजित पवार यांनी शिवजयंती सोहळा शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर होणार असून या वेळी प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती दिली.

Share This News
error: Content is protected !!