मुंबई- महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदा मात्र शिवजयंतीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवनेरी किल्ल्यावर येणार नाहीत अशी माहीती मिळत आहे.
शिवजयंती उत्सवासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दोन वर्षे कोरोनामुळे शिवजयंती साधेपणाने साजरी करावी लागली आहे. त्यामुळे यंदा शिवजयंती कशी साजरी केली जाणार याबाबत सर्वांच्याच मनामध्ये उत्सुकता आहे. शिवजयंतीला त्याच प्रमाणे वर्षभर अनेक शिवभक्त आणि पर्यटक शिवनेरी किल्ल्यावर भेट देतात .
यंदा मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवजयंतीला शिवनेरीवर उपस्थित राहणार नाहीत. यंदाची शिवजयंती शिवनेरीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रवासाची बंदी असल्यामुळे प्रकृतीची काळजी घेण्यासाठी प्रवासाची बंदी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पहिल्यांदाच शिवनेरी किल्ल्यावर जाणार नाहीत.