घरगुती भांडणातून सासूने असा घातला वर्मी घाव; सुनेचा जागीच मृत्यू, नंतर असा लपवायचा केला प्रयत्न

951 0

पुणे : घरगुती भांडणातून सासूने सुनेला केलेल्या मारहाणीत तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, लोहगाव येथील कलवड वस्ती येथे पाय घसरून पडल्याने एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान उपचारासाठी या विवाहितेला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान डॉक्टरांना आलेल्या संशयावरून ही बाब पोलिसांना कळविण्यात आली .

पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासा अंती सासूनेच घरगुती भांडणातून सुनेला मारहाण केली. या मारहाणीमध्ये तिचे डोकं हे फ्रीजवर जाऊन आपटल्याने तिचा मृत्यू ओढावला. घरातच तिचा मृत्यू झाला होता परंतु आपला गुन्हा लपवण्यासाठी या चतुर सासून सून घरात घसरून पडल्याच सांगितलं. आपल्या गुन्ह्याची कबुली सासूने दिली आहे.

विमानतळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा उघडकीस आला आहे.

Share This News
error: Content is protected !!