नगर पुणे महामार्गावर जागेवर उभा असलेल्या कंटेनरला कारची जोरदार धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

838 0

पुणे : नगर पुणे महामार्गावर कारेगाव जवळ मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला कारने जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, एकाच कुटुंबातील चौघांचा अपघात स्थळीच मृत्यू झाला आहे.

या अपघातामध्ये भोंडवे कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी अंत झाला. यामध्ये आई-वडील ,पत्नी आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. तर अश्विन भोंडवे हे गंभीर जखमी झाले आहेत.

अरे बापरे ! 12 वी इंग्रजी बोर्डाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेत प्रश्ना सोबतच उत्तर ! नेमकं काय झालयं ?

याप्रकरणी कंटेनर चालक बबलू चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भोंडवे कुटुंबीय हे चाकण येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. कारने चाकण कडे जात असताना दुपारच्या सुमारास फलके मळ्याजवळ पुण्याच्या दिशेने तोंड करून उभ्या असलेल्या कंटेनरवर त्यांची कार जोरदार धडकली यामध्ये सुदाम भोंडवे, सिंधुताई आणि आनंदी यांचा जागीच मृत्यू झाला. कार क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढावी लागली ही कार कंटेनरच्या खाली घुसल्यामुळे अडकून बसली होती. तर स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले.

#CYBER CRIME : लग्नाचं द्यायचा वचन.., सोशल मीडियावर बनावट अकाउंट बनवून अशी केली अनेक महिलांची लाखो रुपयांची फसवणूक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!