HSC EXAM : सध्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. दरम्यान आज बारावी इंग्रजीचा पेपर होता. या पेपरमध्ये एक मोठा गोंधळ समोर आला आहे. यामध्ये इंग्रजी परीक्षेत तीन प्रश्नांपैकी एका प्रश्नाचं उत्तर देखील प्रश्नपत्रिकेतचं छापले गेले आहे. हा गोंधळ लक्षात आल्यानंतर उत्तर पत्रिका तपासणाऱ्यास काही सूचना दिल्या असल्याचे देखील समजत आहे.
राज्य मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान पहिल्याच पेपरमध्ये एक मोठी चूक झाली आहे. एकीकडे परीक्षा कॉपीमुक्त आणि कडक वातावरणात व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असताना शिक्षकांसाठी देण्यात येणाऱ्या मॉडेल अन्सर की मधील माहिती इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील सेक्शन दोन, प्रश्न तीन-ए मध्ये सहा गुणांच्या विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये देण्यात आल्याने विद्यार्थी बुचकळ्यात पडले होते.
दरम्यान बोर्डाची प्रिंटिंग चूक असल्याचं सांगून विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवण्यासाठी सांगण्यात आलं. बोर्डाच्या नियमानुसार ज्यांनी हा प्रश्न सोडवला आहे त्यांना हे गुण दिले जाणार आहेत.