बनावट दस्तऐवज तयार करून बुलडाण्यातील व्यापाऱ्याने बुडवला 100 कोटीचा जीएसटी

607 0

बुलढाणा- बुलडाणा जिल्ह्यात एका व्यापाऱ्याने बनावट दस्तऐवज वापरून, अधिकाऱ्यांच्या सह्या आणि शिक्के याचा वापर करून तब्बल १०० कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

खामगाव येथील जीएसटी सहायक आयुक्त चेतनसिंग राजपूत यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकरणी खामगाव येथील MIDC मध्ये देवकी ऍग्रो इंडस्ट्रीचे मालक नितीन टावरी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना सहायक आयुक्त चेतनसिंग राजपूत यांनी सांगितले की, खामगाव येथील MIDC मध्ये देवकी ऍग्रो इंडस्ट्रीचे मालक नितीन टावरी यांनी
जीएसटीचे तब्बल 100 कोटी रुपये बुडवल्याचे निष्पन्न झाले आहे. हा प्रकार कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून या व्यापाऱ्याने चक्क बनावट दस्तऐवज तयार करून अधिकाऱ्यांच्या सह्या आणि शिक्के सुद्धा बनावट वापरल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे. टावरी याच्या मालकीच्या तब्बल 6 कंपन्या असून या कंपन्यांचे ऑडिट केल्यानंतर तब्बल 100 कोटी रुपयांच्या GST कर बुडवल्याचे समोर येईल असा दावा चेतनसिंग राजपूत यांनी केला आहे.

Share This News
error: Content is protected !!