Breaking News

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा कसा घ्यावा लाभ, जाणून घ्या

487 0

नवीन वर्षात, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. मात्र सध्या काही शेतकरी असे आहेत की, जे या सरकारकडून सुरू असलेल्या या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत.जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर हे लक्षात घ्या की सरकार लवकरच 11 व्या हप्त्यासाठीचे पैसे जारी करणार आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रोसेस या योजनेसाठी महत्त्वाची आहे पंचायत सचिव पटवारी किंवा स्थानिक कॉमन सर्विस सेंटर द्वारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

जाणून घ्या, कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करावे

* सर्वप्रथम PM Kisan च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
* आता Farmers Corner वर जा.
* येथे तुम्हाला ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
* यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
* यासोबतच कॅप्चा कोड टाकून राज्य निवडावे लागेल आणि त्यानंतर ही प्रक्रिया पुढे करावी लागेल.
* या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
* यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे.

काही वेळा सरकारकडून खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात, मात्र ते शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत नाहीत. याचे मुख्य कारण तुमचे आधार, खाते क्रमांक आणि बँक खाते क्रमांकातील चूक असू शकते. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत, ज्यांच्याकडे 2 हेक्टर म्हणजे 5 एकर लागवडीयोग्य शेती आहे त्यांनाच त्याचा लाभ मिळतो.

Share This News
error: Content is protected !!