ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

1221 0

मुंबई- मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी अभिनेत्री सीमा देव, अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव आणि नाती आर्य देव आणि अनया देव आहेत.

रमेश देव यांच्या निधनाची बातमी अभिनेते अजिंक्य देव यांनी दिली आहे. रमेश देव यांनी हिंदी, मराठी चित्रपटातून, मराठी नाटकांमधून रंगवलेला नायक खलनायक आजही रसिकांच्या स्मरणात आहे.

तीन दिवसांपूर्वी त्यांचा 93 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी चाहत्यांनीही त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. रमेश देव यांची अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून ओळख आहे.

त्यांचा जन्म 30 जानेवारी 1929 कोल्हापूर येथे झाला. जुन्या मराठी, हिंदी सिनेमात त्यांनी नायक, खलनायक रंगवला आहे. त्यांच्या पत्नी सीमा देव या देखील अभिनेत्री असून या दोघांनी जोडीने अनेक सिनेमामधून भूमिका केल्या आहेत. हृषीकेश मुखर्जी याच्या आनंद सिनेमात रंगवलेला डॉक्टर अनेकांच्या आजही स्मरणात आहे.

 

1956 साली रमेश देव यांनी आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटातून चित्रपटक्षेत्रात प्रवेश केला. तर आरती हा त्यांचा हिंदीमधील पहिला चित्रपट होता. त्यांनी ‘या सुखांनो या’ या मराठी चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे.

Share This News
error: Content is protected !!