पुणे नगर रस्त्यावर भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू, २ जखमी

700 6

पुणे- भरधाव ट्रकने कार आणि दुचाकी गाड्यांना जोरात धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर २ जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर येथे रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास घडला.

भरधाव वेगाने नगरच्या दिशेने जाणारा ट्रक दुभाजकला धडकून विरुद्ध बाजूला उलटला. त्यावेळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कार आणि दोन टू व्हीलर गाड्यांना ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!