पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रोजगार मेळावा, २०४ युवक युवतींना मिळाली रोजगाराची संधी

542 0

पुणे- पुणे शहर व परिसरातील तरुण तरुणींना रोजगार मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. यामध्ये २०४ युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख, शहर उपाध्यक्ष मिलिंद बालवडकर, संदीप बालवडकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष किशोर कांबळे, समन्वयक महेश हांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

या रोजगार मेळाव्यास शहरातील युवा वर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. या अंतर्गत तब्बल २०४ युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. युवा पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हातभार लागावा ही अत्यंत समाधानाची बाब असून अशाच विविध उपक्रमांतून हा प्रयत्न यापुढेही सुरू असेल असा विश्वास यावेळी प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!