चहा पिण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत अनेक खास ठिकाण शोधली असतील…! पण असा चहाप्रेमी नक्कीच पाहिला नसेल; हा व्हिडिओ पाहून नक्की म्हणाल, वाह चाय !

671 0

चहाप्रेमी वेगवेगळ्या चहाच्या टपऱ्या, चहाचे खास ठिकाण किंवा एखादं खास हॉटेल देखील शोधून काढतात. चहाप्रेमी अगदी केव्हाही, कुठेही चहा पिण्यासाठी नाही म्हणतच नसतात. जर तुम्ही चहाप्रेमी मधील एक असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरून हसाल हे तेवढेच खरं… कारण चहाची तल्लफ काय असते हे तुम्हालाही तितकेच माहिती आहे. पहा हा व्हिडिओ…

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला लक्षात आलंय की ह्या बस ड्रायव्हरने भर मोठ्या वाहत्या रस्त्यावर भली मोठी बस थांबवली. स्वतः बस मधून खाली उतरला आणि त्या शहरातील सुप्रसिद्ध चहा वाल्याकडून चहा घेऊन पुन्हा बसमध्ये जाऊन बसला. हा व्हिडिओ एका शुभ नावाच्या ट्विटर युजरने पोस्ट केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत अनेक लाइक्स आणि व्ह्यूज देखील मिळाले आहेत. तर चहाप्रेमी यावर भन्नाट असे कमेंट देखील करत आहेत. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे हे मात्र समजू शकले नाही.

Share This News
error: Content is protected !!