पुणे मार्केटयार्डातील आवारात चोरट्यांचा उच्छाद; कांदा, बटाटा, फळांची चोरी

130 0

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटयार्डातील बाजार आवारात चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय. याठिकाणी शेतमालाच्या चोरीच्या घटना सर्रास घडत असून त्याकडे मात्र बाजार समिती प्रशासनाकडून दुर्लक्ष होतंय.बाजार समितीच्या मार्केटयार्डातील मुख्य बाजार आवारात पुणे विभागासह राज्यातील विविध जिल्ह्यांसह आणि परराज्यातून शेतमालाची दररोज मोठ्या प्रमाणात आवक होते. अनेक ठिकाणी बाजार समितीसह आडत्यांनी स्वतः सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तरीही शेतमालासह कॅरेटची व शेतमालाची चोरी होत असल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

मार्केटयार्डातील विविध गाळ्यांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक होते. अनेक गाळ्यांवर बाजार समितीसह आडत्यांनी स्वतः सीसीटिव्ही कॅमेरे बसविले आहेत. तरीही आडत्यांच्या गाळ्यांवर शेतमालासह कॅरेटची चोरी होत असल्याच्या तक्रारी आडत्यांनी केल्या आहेत.शेतमालाची चोरी होत असल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये बाजार आवारात कांदा, बटाटा, लसूण, फळ विभागात चोरीच्या घटना घडल्या आहेत.

या संदर्भात आडते असोसिएशनने बाजार समिती प्रशासनाशी संपर्क साधला असून सुद्धा प्रशासनाला तक्रारीची दखल घ्यावीशी वाटली नाही. त्यामुळे व्यापारी वर्गातून संताप व्यक्त केला. गेल्या अनेक वर्षापासून चोरीच्या घटना घडत होत्या. परंतु गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बाजार समिती प्रशासनाने सुरक्षारक्षक नेमले असून देखील चोऱ्या होत असल्याचे व्यापारी वर्गाने बाजार समितीने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे

Share This News

Related Post

Ambadas Danve Vs Sandipanrao Bhumre

Ambadas Danve Vs Sandipanrao Bhumre : ‘आज आमची जहागिरी आहे’; अंबादास दानवे आणि संदिपान भुमरेंमध्ये खडाजंगी

Posted by - August 7, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : राज्यात शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात रोज राडा पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये…

Pune News : कामाचा दर्जा सुधारा सामाजिक कार्यकर्त्यानी केली मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

Posted by - December 7, 2023 0
पुणे : सासवड नगरपालिकेच्या राऊत आळी मधील सिमेंट रस्ता तयार होण्याअगोदरच खराब झाला आहे .आपल्या बांधकाम विभाग अधिकारी जागेवर जाऊन…

पुण्यात सायबर चोरट्यानं महिलेला घातला तब्बल 33 लाखांचा गंडा

Posted by - April 25, 2023 0
पुणे: विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली असून एका डॉक्टर महिलेला सायबर चोरट्यांनी…

पुणे : वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे स्वतः उतरल्या रस्त्यावर VIDEO

Posted by - October 20, 2022 0
पुणे : पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस फार बिकट होत चालला आहे.सोलापूर रोड असो किंवा सासवड रोड नित्याची वाहतूक कोंडी…

सरकारी कार्यालयाकडील पाणीपट्टी कधी वसूल करणार ? सजग नागरिक मंचचा महापालिकेला सवाल

Posted by - May 16, 2022 0
पुणे- पुण्यातील केंद्र व राज्य शासनाच्या कार्यालयांकडील पाणीपट्टीची १०५ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी कधी प्रयत्न करणार, असा सवाल सजग…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *