Palghar News

Palghar News : नदीवर पूल नसल्याने गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यातून रुग्णालयात नेले

948 0

पालघर : काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरागांत वसलेलेल्या गावात रस्ता नसल्याने गरोदर महिलेला डोलीतून 6 किलोमीटरपर्यंत पायपीट करत न्यावे लागले होते. यानंतर आता पालघर (Palghar News) जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एका गर्भवती महिलेला लाकडी फळीच्या साहाय्याने नदीच्या पुरातून नेले जात आहे. हा व्हिडिओ पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यातील आहे.

मोखाडा तालुक्यातील कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास चार ते पाच पाड्यांना जोडणारा पिंजाळ नदीवर पूल नसल्याने येथील नागरिकांना नदीतील वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. या ठिकाणच्या लोकांना गावात कोणी आजारी पडल्यास लाकूड आणि चादरीच्या साह्याने डोली करून येथील रुग्णांना लाकडी फळीच्या आधारावर नदी पार करावी लागते.

सोमवारी एका गरोदर महिलेला अचानक उलट्या होऊ लागल्याने तिला आधी डोलीतून नंतर लाकडी फळीवर नदी पार करावी लागली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून अनेक लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

Share This News
error: Content is protected !!