टकाटक 2 मधील हे जबरदस्त गाणे पाहिले का ? बनवाबनवीतील ‘ या ‘ गाण्याचा आहे भन्नाट रिमेक…

453 0

टकाटक या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावलं , तर एकीकडे सहज बोलला न जाणारा विषय देखील हसत खेळत मांडला आहे. आता या चित्रपटाचा दुसरा भाग देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे . त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता तर वाढली आहेच , परंतु निर्मात्यांनी आणखीन एक तडका या चित्रपटांमध्ये मारला आहे . हा तडका आहे या चित्रपटातील हे स्पेशल सॉंग …

मराठी चित्रपट साम्राज्यावर आज देखील राज्य करणारा चित्रपट म्हणजेच बनवाबनवी हा आहे. या चित्रपटातील प्रत्येकच गोष्ट मराठी माणसाच्या आजही ध्यानीमनी कोरलेली असताना , यातीलच एक फेमस गाणं पुन्हा एकदा नव्या ढंगात या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एन्जॉय करता येणार आहे. त्यावेळी देखील अबाल वृद्धांना नाचायला लावणार हे गाणं आता पुन्हा एकदा काय कमाल करते आहे हे तुम्ही या गाण्यातूनच पहा …

‘ हृदयी वसंत फुलताना ‘ या गाण्याचा एक रीमेक या चित्रपटामध्ये करण्यात आला आहे . गीतकार जय अत्रे यांनी या गाण्याला पुन्हा एकदा शब्दांमध्ये गुंफल आहे . तर श्रुती राणे या गायिकेने स्वरबद्ध केल आहे. या गाण्याला वरून लिखिते यांनी संगीत दिले आहे . तर गाण्याचे नृत्यदिग्दर्शन राहुल संजय यांनी केले आहे.
विशेष म्हणजे या गाण्यांमध्ये हॅलो चार्ली, सेक्रेड गेम्स , अभय अशा हिंदीतील प्रसिद्ध वेब सिरीज मधील अभिनेत्री इलनाझ हिने आपल्या सौंदर्याची जादू या गाण्यांमध्ये पसरवली आहे . तिच्या सुंदर आणि मादक अदांनी या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे .

टकाटक २ मध्ये मुख्य भूमिकेत पुन्हा एकदा प्रथमेश परब ,प्रणाली भालेराव ,अक्षय केळकर ,अजिंक्य राऊत ,भूमिका कदम ,कोमल बोडके हे कलाकार दिसणार आहेत.

Share This News
vaycasino Tipobet holiganbet galabet jojobet imajbet casibom jojobet marsbahis betsmove giriş pashagaming timebet jojobet holiganbet holiganbet marsbahis ultrabet betcio jojobet marsbahis casibom casibom casibom marsbahis
error: Content is protected !!