पुणेकरांचा शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा वर्षभराचा पाणी प्रश्न मिटला ; कोणत्या धरणांत किती पाणीसाठा ? पाहा VIDEO

315 0

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांचा एकूण साठा ९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळं पुणेकरांचा वर्षभराचा पाणीप्रश्न मिटला आहे.

जुलैमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे. सध्या चारही धरणांमधील पाणीसाठा ९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. चारही धरणांमधील पाणीसाठा किती टीएमसी आणि किती टक्क्यांपर्यंत झाला आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया.प्रमुख धरणांमधील

पाणीसाठा TMC , टक्क्यांत
टेमघर            3.47 93.72
वरसगाव        12.82 100
पानशेत         10.65 100
खडकवासला 1.97 100
————————————————–
एकूण 28.92 99.02

आज सकाळपर्यंत खडकवासला धरणातून मुठा नदीत १३ हजार ९८१ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. टेमघर धरण क्षेत्रात ७० मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात प्रत्येकी ४१ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात अवघ्या सहा मि.मी. पावसाची नोंद झाली. सोमवारी रात्री नऊ वाजल्यापासून मुठा नदीत १८ हजार ४९१ क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते.

आज सकाळपासून वरसगाव आणि पानशेत धरणांमधून विसर्ग कमी करण्यात आला. वरसगाव धरणातून २९८५ क्युसेक, तर पानशेत धरणातून ४४८० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून सकाळी नऊ वाजल्यापासून १३ हजार ९८१ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. धरणांच्या परिसरातील पावसाच्या प्रमाणानुसार पाण्याच्या विसर्गात वाढ किंवा कपात करण्यात येईल, असे खडकवासला धरण साखळी प्रकल्पाचे सहायक अभियंता यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही तीन धरणे १०० टक्के, तर टेमघर धरण ९३ टक्के भरले आहे. लवकरच टेमघर धरणही पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाला शेतीसाठी पुढील वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा धरणांत जमा झाला झाल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे.

Share This News

Related Post

कोरोना काळातील व्यापाऱ्यांवरील खटले विनाविलंब मागे घेणार – देवेंद्र फडणवीस

Posted by - August 11, 2022 0
पुणे: शासनाने एप्रिल २०२१ मध्ये परत लॉक डाउन लावल्याने हवालदिल झालेल्या व्यापाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शांततामय मार्गाने साखळी आंदोलन केले…

नवाब मलिकांना दिलासा नाहीच ! मलिकांच्या याचिकेवर सोमवारी पुन्हा सुनावणी

Posted by - March 2, 2022 0
पुणे- विशेष पीएमएलए न्यायालयाने सुनावलेली ईडी कोठडी रद्द करण्यासाठी नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेवर आज…

मोठी बातमी ! पुण्यातील स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted by - April 20, 2022 0
पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो प्रकल्पास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.…

प्रजासत्ताक दिन विशेष : देशाच्या राज्यघटनेची पहिली प्रत कुठे छापण्यात आली माहित आहे का ? वाढवा तुमचे सामान्य ज्ञान

Posted by - January 25, 2023 0
डेहराडून : देशात यंदा 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. २६ जानेवारी १९५० रोजी पहिल्यांदा प्रजासत्ताक दिन साजरा…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Posted by - November 29, 2022 0
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *